टीम AM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेकदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांकडून सिबील स्कोअर तपासला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही, पैसे नसल्यानं ऐन पेरणीच्या हंगामाममध्ये शेतकरी अडचणीत सापडतो. या संदर्भात आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोअची मागणी होणार नाही, शेतकऱ्यांकडे सिबील स्कोअर मागणाऱ्यांवर कारवाई करणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.