टीम AM : पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 13 व 14 मे रोजी तर विदर्भात 11 मे व 12 मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
11 ते 13 मे दरम्यान नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे तसेच 11 मे रोजी धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
तसेच यंदा मान्सून देखील 3 ते 6 जून दरम्यान महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.