टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे 36 वर्षीय महिला वकिलाला शेतामध्ये रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील 10 ते 12 जणांनी हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिला वकिलाने गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार केली होती. याचा राग आल्याने गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी ज्ञानेश्वरी यांना मारहाण केली आहे. आता या महिलेचे मारहाण केलेले फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. यामुळे संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वरी या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. दरम्यान, यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.