सई आणि समीरचा व्हिडीओ व्हायरल : ‘चल जाऊ डेटवर’ गाण्याची विशेष चर्चा

टीम AM : सोशल मिडियावर सध्या सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सई आणि समीरचा व्हायरल होणारा व्हिडीओ ‘गुलकंद’ या चित्रपटातील ‘चल जाऊ डेटवर’ या गाण्यावरील आहे. या गाण्यामध्ये सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत आहे. सईचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. गाण्यात सई समीरच्या गालावर किस करते. दोघांचे हे रोमँटिक गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.

‘गुलकंद’ या चित्रपटात सई आणि समीर पती पत्नी दाखवले आहेत. सुरुवातीला सई ही थोड्या वेगळ्या अंदाजात दिसत आहे. साध्या, सरळ बायकोच्या लूकमध्ये सई दिसत आहे. पण नंतर अचानक सईचा मेकओव्हर दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

‘गुलकंद’ चित्रपटाविषयी

‘गुलकंद’ या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे तर लेखन सचिन मोटे यांनी केले आहे. हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.