दहावीच्या परीक्षा : कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई, वाचा… 

टीम AM : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात या परीक्षांबाबत नियोजन सुरू झालं आहे. 

यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड मधून 1 लाख 88 हजार, 777 विद्यार्थी परीक्षा देणार असून, 664 परीक्षा केंद्रं असणार आहेत. 

विभागात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून, कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा, विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जमादार यांनी दिला आहे.