नोकरीची संधी : सामाजिक न्याय विभागात भरती प्रक्रिया सुरु, वाचा…

टीम AM : सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग – 3 संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन परीक्षा दि. 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. उमेदवारांना दि. 25 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

भरती प्रक्रियेबाबत अधिकृत माहितीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वरील संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.