‘लॉन्ग मार्च’ : सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय द्या, हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना, वाचा…

टीम AM : आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी परभणी ते मुंबई असा ‘लॉन्ग मार्च’ काढला आहे. आज ‘लॉन्ग मार्च’ चा दुसरा दिवस आहे. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालं होतं. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी तसच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांच शासनाने पूर्नवसन करावं. त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी. निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी ‘लॉन्ग मार्च’ काढला आहे. शुक्रवारी सायंकाळी परभणीतून या ‘लाँग मार्च’ ला सुरुवात झाली. काल कुंभकर्ण टाकळी येथे पहिला मुक्काम जिल्हा परिषद शाळेत होता.

आज दुसऱ्यादिवशी काही वेळात ‘लॉन्ग मार्च’ जिंतूर तालुक्यातील बोरीकडे रवाना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायी मार्चमध्ये सहभागी झालेत. त्यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. परभणी ते मुंबई असा ‘लाँग मार्च’ आयोजित करण्यात आलेला आहे. रस्त्यामध्ये ‘लॉन्ग मार्च’ मध्ये अनेक अनुयायी सहभागी होत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या प्रमुख मागणीसाठी ‘लॉन्ग मार्च’ काढण्यात आला आहे.