सर्व स्तरांतून होतयं अभिनंदन
टीम AM : अंबाजोगाई येथील काव्या महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी देशमुख ही फॅशन डिझाईन स्पर्धेत राज्यात प्रथम आली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड आयोजित राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धा दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी बीड येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील बीडसह धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, ठाणे, पुणे, परभणी, नाशिक, लातूर, मुंबई येथील जवळपास 130 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. फॅशन डिझाईन अभ्यासक्रमामधील अनेक मुलींनी व महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय ड्रेस डिझायनिंग स्पर्धेमध्ये काव्या महिला महाविद्यालय, अंबाजोगाई येथील 8 मुलींनी सहभाग नोंदविला. यात साक्षी देशमुख हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
साक्षी देशमुख च्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयंत करपे, प्राचार्या करुणा लोमटे, प्रा. शीला गायकवाड, आदमाने, पूजा नरवाडे, शिंदे निकिता, प्रा. शिशिकांत राडे, प्रा. मुकुंद काळे यांनी अभिनंदन केले आहे.