अंबाजोगाईत मनुस्मृतीचे दहन : विषमतावादी व्यवस्थेचा केला निषेध

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी 

टीम AM : अंबाजोगाईत मनुस्मृती दहन करून विषमतावादी व्यवस्था नाकारत शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भारतीय संविधान प्रेमी नागरिकांकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा जयघोष करण्यात आला.

संविधान प्रेमी नागरिकांकडून बुधवार, दिनांक 25 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर सहभागी आंदोलकांनी मनुस्मृती दहन केले. यावेळी कॉ. बब्रुवाहन पोटभरे, भीमराव सरवदे, आर. जी. मस्के, अशोक पालके, राजेश वाहुळे, धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, हमीद चौधरी यांनी उपस्थित संविधान प्रेमी नागरिकांना संबोधित केले. उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन करून येथील विषमतावादी व्यवस्था नाकारली, स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले. परंतू, आजही या देशामध्ये संविधान लागू असतांना सुध्दा येथे मनुचा विचार जपला जातो. राजस्थानमध्ये जाहिररित्या मनुचे मंदीर बांधले जाते, रोज स्त्रियांना गुलाम बनविणारे विचार जाहिररित्या पेरले जातात, सनातनी कॉर्पोरेट सत्ता भारतात आणि महाराष्ट्र राज्यात आल्यापासून दलित, अदिवासी, अल्पसंख्याक यांना लक्ष करून पोलीसांमार्फत यांची दडपशाही केली जातेय. मनुची विषमतावादी व्यवस्था टिकविण्यासाठी शासन व प्रशासन काम करीत आहे. 

या विषमतावादी व्यवस्थेचा आम्ही जाहिर निषेध करून त्या मनुची मनुस्मृती नाकारत आहोत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर निवेदक कॉ. बब्रुवाहन पोटभरे, भिमराव सरवदे, आर.जी. मस्के, अशोक पालके, धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, हमीद चौधरी, राजेश वाहुळे, अनिल ओव्हाळ, अशोक ढवारे, अविनाश कुऱ्हाडे, रवि आवाडे, मुक्ता वायदंडे, बादल तरकसे, प्रेम माने, वैजनाथ वाघमारे, मनिष आदमाने, संघपाल तरकसे, गुलनाज शेख, अमोल सरवदे, अजय गोरे, बाबा शेख, प्रदीप वारकरी, राकेश काळे, सुशिल गायकवाड, दिलीप गोरे, राम काटे, हनुमंत गायकवाड, विद्या गायकवाड, मंजुषा कसबे, आरोही कसबे, छाया कसबे, लक्ष्मी कसबे, सुनंदा जोगदंड, विद्या गावडे, उषा गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रसंगी विशाल पोटभरे, अमर वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.