टीम AM : बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यात देव दहिफळ इथं काल कुस्त्यांची दंगल पार पडली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भोला ठाकूर यांची रोमहर्षक लढत या दंगलीचं मुख्य आकर्षण ठरली.
या लढतीत सिकंदरनं भोलाला अवघ्या साडेतीन मिनिटात आसमान दाखवलं. पाच लाख रुपये पारितोषिकासह ‘युवा केसरी’ चा बहुमान सिकंदरनं पटकावला. पैलवान सूरज शेख यानं मानाची चांदीची गदा पटकावली. स्पर्धेतल्या सर्व विजयी उमेदवारांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आलं. दरम्यान, कुस्त्यांची ही दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.