टीम AM : महायुती सरकारने अखेरीस खातेवाटप जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या खात्यांचा भार असणार आहे.
संपूर्ण यादी
4. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5. राधाकृष्ण विखेपाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
6. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7. चंद्रकात पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
8. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
9. गणेश नाईक – पर्यटन
10. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
11. दादा भुसे – शालेय शिक्षण
12. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
13. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
15. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
16. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
17. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
18. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतणीकर
19. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20. शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय