राज्य मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ? वाचा… 

टीम AM : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, महायुतीतल्या तीनही पक्षांचे नवनिर्वाचित आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतील. नागपूर इथं राजभवनात उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता हा शपथग्रहण समारोह होणार आहे. राजभवनातून ही माहिती देण्यात आली.

दरम्यान, मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली असून तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

गेल्या आठवड्यात 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवं सरकार स्थापन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here