टीम AM : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं, महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं.
तटकरे म्हणाल्या की, अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही. त्याच्यामुळे कुठलीही स्क्रुटीनी किंवा फेरचौकशी किंवा फेरतपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज कुणीही त्याबाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आहे, असं तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.