‘डीसीएस’ मोबाईल ॲपद्वारे होणार‌ आता ई – पीक पाहणी, वाचा… 

टीम AM : रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2024 पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई – पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतू, आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरूस्ती करून नवीन रूपात ई – पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नंतर 100 टक्के सुधारित ई – पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी. जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरीत पीक पाहणी जी शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही, ती तलाठी यांच्यामार्फत होत असत. त्यामध्ये दुरूस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे.  पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई – पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.

 नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता

◾पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे. 

◾पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक.

 सुधारित ॲपमधील नवीन सुविधा

◾शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहायक उपलब्ध असेल, असेही प्रशासनाने कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here