विधानसभा निवडणूक : 187 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, वाचा… 

टीम AM : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी गेल्या 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झालीय. या दरम्यानच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे अनेक प्रकरणे पुढे आले आहेत. 

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधींची मालमत्ता देखील जप्त जप्त करण्यात आली आहे. 

यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादींचा समावेश आहे. दिनांक 15 ते 30 ऑक्टोबर या 15 दिवसांच्या दरम्यान एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.