मंत्रिमंडळ बैठक : राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ, वाचा… 

टीम AM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे

◾ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुर  संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय

◾ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

◾ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

◾ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

◾ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

◾ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. 1486 कोटीचा प्रकल्प

◾ करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

◾ यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

◾ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

◾ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

◾राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

◾ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम : राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

◾ हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

◾ एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

◾ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

◾ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

◾ राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

◾ छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

◾ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

◾ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

◾ श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

◾ दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

◾ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर 

वरिल निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.