टीम AM : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, मुलींसाठी तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
बदलापूर मधील अनुचित प्रकारामुळे देश हादरला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत.