अंबाजोगाई इनरव्हील क्लबने मतिमंद शाळेस दिली पाण्याची टाकी
अंबाजोगाई : इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने बाबासाहेब परांजपे मतिमंद विद्यालयास 1 हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी डिस्ट्रीक चेअरमन सायली खानदेशी यांच्या हस्ते भेट देण्यात आली. यावेळी सायली खानदेशी यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा घेवून क्लबच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.
अंबाजोगाई इनरव्हील क्लबच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रीक चेअरमन सायली खानदेशी तर विचारमंचावर इनरव्हीलच्या अध्यक्षा सुहासिनी मोदी, अंजली चरखा, सोनाली कर्नावट, गिता परदेशी, मिना डागा, अनिता फड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिपप्रज्ज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सुहासिनी मोदी यांनी केले. यावेळी इनरव्हिल क्लबने संपादित केलेल्या ‘नारी चेतना’ या वार्षिक अंकाचे विमोचन करण्यात आले. बाबासाहेब पंराजपे मतीमंद विघालयाच्या मुख्याध्यापिका अनिता चौधरी यांचा सत्कार ‘ममता मिशन’ अंतर्गत करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सायली खानदेशी म्हणाल्या की, अनाथ मुला-मुलींना दत्तक घेवून त्यांना आई व वडीलांचे प्रेम द्यावे, अनाथ मुले ते कधीच विसरणार नाहीत तर ते याची सदैव जाणीव ठेवतील. चार दिवस अनाथ मुलांसोबत रहा, त्यांना आनंद वाटेल. अनाथ मुलांच्या चेह-यावर आनंद फुलवा, अनावश्यक खर्च टाळून ते पैसे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी द्या, अंबाजोगाईचा इनरव्हील ग्रुप हा अतिशय चांगले कार्य करीत आहे, तो वर्षभर विविध विधायक उपक्रम राबवितो. त्यांच्यापासुन समाजाला प्रेरणा मिळते. समाजाला ऊर्जा देण्याचे काम इनरव्हील क्लब अंबाजोगाई करीत असल्याचे गौरवोद्गार सायली खानदेशी यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहासिनी मोदी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सुरेखा सिरसाट यांनी करून दिला.सुत्रसंचालन अंजली निर्मळे यांनी करून उपस्थितांचे आभार अनिता फड यांनी मानले. कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या सोनाली कर्नावट, सरिता जाजू, अर्चना मुंदडा, वैजयंती टाकळकर, दिशा लोमटे, सारिका घुगे, शिवकन्या सोळंके, सुवर्णा बुरांडे, रेखा शितोळे, वर्षा देशमुख आदींसहित सर्व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.