‘तंगलान 2’: ‘तंगलान’ ला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सिक्वेलची केली घोषणा

टीम AM : साऊथचा सुपरस्टार विक्रम सध्या ‘तंगलान’ मुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याचा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून विक्रमने ‘तंगलान 2’ ची घोषणा केली आहे.

हैद्राबाद येथे झालेल्या आभार सभेत विक्रमने या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. अभिनेत्याच्या या घोषणेचे चाहत्यांनी जोरदार टाळ्या आणि जल्लोषात स्वागत केले. ते हैदराबाद येथे एका आभार सभेला उपस्थित होते, त्यादरम्यान ते म्हणाले, ‘पा रंजित यांनी मला येथे सांगायला सांगितले की, तुम्हा सर्वांना ‘तंगलान’ खूप आवडला असल्याने आम्ही चर्चा केली आहे आणि आम्ही लवकरच भाग 2 बनवणार आहोत. 

हैदराबादमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेनंतर माध्यमांशी संवाद साधताना विक्रमने ‘तंगलान’ च्या सिक्वेलबद्दल खुलासा केला. यासोबतच ‘थंगालन 2’ लवकरच करणार असल्याची पुष्टी त्यांनी केली. चाहत्यांना चित्रपटाच्या शूटिंगचे अपडेट्स दिले जातील. विक्रम म्हणाला, ‘तंगलान’ ही आपल्या मातीची गोष्ट आहे. मला नेहमी खात्री होती की, तेलुगू प्रेक्षक आमचा चित्रपट खूप हिट करतील. याचे श्रेय दिग्दर्शक पा रंजित यांना जाते. अभिनेत्री पार्वती थिरुवोथू आणि अभिनेत्री मालविका मोहनन यांनी उत्कृष्ट अभिनय केला आणि जीव्ही प्रकाश कुमार यांच्या संगीताने चित्रपटाला चार चांद लावले.’

विक्रम, पार्वती आणि मालविका मोहनन अभिनीत हा चित्रपट 1850 च्या दशकातील नॉर्थ अर्कोटमध्ये सोन्याच्या खानीवर आधारित आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक झाले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 13.30 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील राम पोथीनेनीच्या ‘डबल iSmart’ आणि रवी तेजाच्या ‘मिस्टर बच्चन’ शी टक्कर झाली. दुसऱ्या दिवशी ‘तंगलान’ ने 4.75 कोटींची कमाई केली होती.

‘तंगलान’ चे दिग्दर्शन पा रंजित यांनी केले आहे आणि पहिल्यांदाच जीव्ही प्रकाश या दिग्दर्शकासोबत त्यांनी काम केले आहे. या चित्रपटात विक्रम सोबत पार्वती थिरुवुथु, मालविका मोहनन, पशुपती आणि आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘तंगलान’ हे ब्रिटीश वसाहत काळात घडवलेले एक शक्तिशाली ॲक्शन ड्रामा आहे. हा चित्रपट आदिवासींच्या समूहाभोवती फिरतो. ज्यांना कोलार गोल्ड फील्डमध्ये सोने शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकारी बोलावतात. चित्रपटाचे पोस्ट – थिएट्रिकल स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत.