अंबाजोगाई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 रुपयाचा लाभ दिला जात आहे.
सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी योजनेशी संबंधित शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप सदर योजनेच्या लाभापासून काही शेतकरी वंचीत राहीलेले आहेत. ज्या शेतकऱ्याचे नावे त्रुटीमध्ये आहेत किंवा ज्यांची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही,अशा शेतकऱ्यांनी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स आदी कागदपत्रे त्यांच्या गावचे संबंधीत तलाठी यांच्याकडे जमा करावीत. जेणेकरुन पात्र शेतकऱ्यांची नावे सदर योजनेशी संबंधीत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील व योजनेपासून कोणीही वंचीत राहणार नाही. असे रुईकर यांनी म्हणटले आहे.