महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सलग 7 वेळा पुरस्कार : ॲड. सुनील सौंदरमल यांची माहिती
टीम AM : आधार मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड महाराष्ट्र आणि कर्नाटक या संस्थेची स्थापना होऊन 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. 12 वर्षांमध्ये संस्थेला विविध सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र राज्य फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट आणि बँक इत्यादीच्या माध्यमातून तब्बल 30 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2024 चा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या मार्फत दिला जाणारा 50 कोटी ते 100 कोटी या गटातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ‘आधार मल्टीस्टेट’ ला जाहीर झाला असल्याचे आधारचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील सौंदरमल यांनी सांगितले.
अल्पावधीतच महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ‘आधार मल्टीस्टेट’ ने अनेक विक्रम केलेले आहेत. केवळ तांत्रिक पद्धतीने बँकिंग न करता सामाजिक बँकिंग घेऊन ‘आधार मल्टीस्टेट’ चे कार्य सुरू आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, महापुरुषांच्या जयंती साजरा करणे, बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी होण्यासाठी कर्ज पुरवठा करणे, महिलांसाठी हळदी – कुंकवाचे आयोजन करणे आणि रिझर्व बँक व सहकार खात्याच्या नियमाचे काटेकोर पालन करणे, हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य ठरलेले आहेत. तसेच संस्थेच्या संचालक मंडळामध्ये अनेक तज्ञ संचालक आहेत. या सर्व संचालकांचे बारीक लक्ष व्यवहारावर असल्यामुळे संस्थेची सातत्याने वाढ होत आहे. तसेच संस्थेने दुसऱ्या वर्षापासून सभासदांना लाभांश वाटप केलेला आहे.
संस्था सातत्याने नफ्यात चालत आहे. संस्थेच्या एकूण सहा शाखा असून पैकी तीन शाखा मालकीच्या जागेत कार्यरत आहेत. अशा या सर्व बाबींचा विचार करून या संस्थेला ‘दीपस्तंभ पुरस्कार – 2024’ जाहीर झाला असून याचे वितरण हैदराबाद येथील सुप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. याबद्दल आधार परिवारातील सर्व कर्मचारी व संचालकांचे अनेक हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.