अंबाजोगाईत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या 

टीम AM : अंबाजोगाई शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 20 जुलै रोजी शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील शिक्षक कॉलनीत [लातूर रोड] बालासाहेब बाबुराव गंगणे [वय 53] यांचं राहते घर आहे. आज सकाळी त्यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत. बालासाहेब बाबुराव गंगणे हे जि .प. शाळा, वाघाळा येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आईवडील आहेत.