महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाची शक्यता : काय आहे हवामान विभागाचा अंदाज ? वाचा… 

टीम AM : महाराष्ट्रात आज विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज 23 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावणार आहे.

महाराष्ट्र ‘डीजीआयपीआर’ ने एक्सवर ट्विट करून हवामान विभागाचा अंदाज शेअर केला आहे. या अंदाजानुसार, कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज 23 जूनला कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.