टीम AM : मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागतात. मग, सुट्टीत फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखले जातात. खास करून कुठेतरी दूर आणि थंडावा मिळेल अशा ठिकाणांची निवड केली जाते. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्हाला आराम मिळेल आणि भरपूर आनंदही मिळेल.
यंदाच्या सुट्टीत तुम्ही जर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल आणि तुमची ट्रीप मस्त होईल. चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांबद्दल.
मिरिक
पश्चिम बंगाल या राज्यात हे सुप्रसिद्ध हिलस्टेशन स्थित आहे. तिथल्या सर्वात सुंदर हिलस्टेशन्समध्ये या मिरिकचा पहिला क्रमांक लागतो. असंख्य पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी कौटुंबिक सहलीसाठी जाऊ शकता. विशेष म्हणजे उन्हाळ्यातही येथील तापमान वीस अंशांच्या वर जात नाही. येथील निसर्ग, डोंगराचा परिसर, धबधबे आणि इतर अनेक पर्यटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.
कन्नूर
कुन्नूर हे ठिकाण तामिळनाडू राज्यात स्थित आहे. हे एक लोकप्रिय हिलस्टेशन आहे. येथील मनमोहक निसर्ग आणि शांत वातावरणाच्या तुम्ही प्रेमात पडाल, यात काही शंका नाही. त्यामुळे, देश – विदेशातील असंख्य पर्यटक निवांत वेळ घालवण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. येथील चहाचे मळे, निलगिरी रेल्वे आणि उंच पर्वत तुम्हाला भुरळ घालतील. या ठिकाणी तुम्ही मस्त फिरू शकता.
चेरापुंजी
देशात ज्या ठिकाणी पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो, ते ठिकाण म्हणजे चेरापुंजी होय. ईशान्य भारतातील हे एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही सुट्टीत नक्कीच भेट देऊ शकता. शिवाय, येथील वातावरण थंड असते. उन्हाळ्यात येथील तापमान 15 ते 23 अंशांच्या दरम्यान असते. येथील सुंदर परिसर, निसर्ग आणि धबधबे तुम्हाला आवडतील, यात काही शंका नाही.