खळबळजनक : अंबासाखर परिसरात तरुणाचा खून

टीम AM : अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या अंबासाखर कारखान्याच्या परिसरात आज रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय आत्माराम राठोड [वय 35 रा. राडी तांडा] असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो अंबासाखर परिसरात असताना एका व्यक्तीने त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याची माहिती आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलीस पुढील तपास करित आहेत.