शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नका : ‘यांनी’ दिले आदेश

टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र वापरू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अजित पवार गट हा प्रचारासाठी शरद पवार यांचं छायाचित्र आणि नाव वापरत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. 

अजित पवार गट हा निवडणूक आल्यावर शरद पवार यांचं नाव वापरतो, मात्र निवडणूक नसतांना त्यांना त्यांची गरज वाटत नाही. आता जर तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे तर तेच पुढे सुरू ठेवावं, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. 

या संदर्भात अजित पवार गटाला दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं असून या संदर्भातील पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे.