टीम AM : राज्यभर मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त मराठी भाषेविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली. याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धनाविषयी मोठं पाऊल उचललं आहे.
राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळेत आता पहिल्या तुकडीपासुन मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. मराठी भाषा विषय न शिकवणाऱ्या शाळेची मान्यता रद्द केली जाणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.