‘सीबीएसई’ दहावी – बारावीच्या परीक्षा : प्रश्नपत्रिका… मंडळानं केलं आवाहन, वाचा.. 

टीम AM : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’ च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या पंधरा फेब्रुवारी ते दोन एप्रिल या कालावधीत होणार असून या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंडळानं पूर्ण तयारी केली आहे.

मात्र, काही दिवसांपासून काही उपद्रवी आणि खोडसाळ व्यक्तींनी विविध समाज माध्यमांवरून या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या असल्याचा अपप्रचार चालवला असून, या प्रश्नपत्रिका देण्याच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांकडून पैसे लुबाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

यातली कोणतीही बाब खरी नाही आणि कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, असा खुलासा ‘सीबीएसई’ नं केला आहे. अशा व्यक्तींची माहिती मिळाल्यास ती मंडळाला इन्फो डॉट ‘सीबीएससी’ एक्झाम ॲट ‘सीबीएससी’ शिक्षा डॉट इन या ईमेल पत्त्यावर कळवावी, असं आवाहनही मंडळाने केलं आहे.