राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून वधुवरांस दिले शुभाशिर्वाद
टीम AM : अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी यांचे सुपुत्र संकेत राजकिशोर मोदी यांचा विवाह सोहळा शुक्रवार [दि. 05] रोजी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. हा विवाह सोहळा दिनांक 02 ते 05 जानेवारी या दरम्यान झाला. या शाही विवाह सोहळ्यात नवविवाहित वधू – वरांस शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री मुजफ्फर हुसेन, दिलीपराव देशमुख, जयदत्त क्षीरसागर,माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार धीरज देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार अमरसिंह पंडित, संजय पवार, अमरनाथ राजुरकर, सुरेश जेथलिया, माजी मंत्री विनायकराव पाटील, यशवंतराव पाटील, योगेश क्षीरसागर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, लक्ष्मण मोरे यांच्यासह सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर संकेत राजकिशोर मोदी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. या विवाह सोहळ्यासाठी दिल्ली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, मुंबई, नागपूर, इंदोर, हैदराबाद, कानपूर, लखनौ, पुणे येथून आलेल्या स्नेही मित्र परिवाराची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती.
हा विवाह सोहळा अत्यंत पारिवारिक, धार्मिक व विधिवत सुनियोजित असा झाला. बारात, संगीत रजनी आणि विवाह असा हा तीन दिवसीय विवाह सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाला. पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 03 जानेवारी रोजी वरास हत्तीवर बसवून सहभागी सर्व मित्र, आप्तेष्ट तथा नातेवाईकांना फेटे बांधून अत्यंत पारंपरिक पद्धतीने बारात काढण्यात आली. यामध्ये घोडे व नागपूर बँडच्या ठेक्यावर आकर्षक वेशभुषेत व विद्युत रोषणाईत नेत्रदिपक अशी न-भुतो न-भविष्यती अशी वरात निघाली होती. त्यानंतर मोदी परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत स्नेहमिलन सोहळ्यात काँटीनेनंटल व पंचपक्वान्न खाण्यासह उपस्थित सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
दुसऱ्या दिवशी दिनांक 4 जानेवारी रोजी मेहंदी, हळदी व संगीताचा कार्यक्रम झाला. संगीताचा कार्यक्रम एखाद्या फिल्मफेअर अवॉर्डच्या धर्तीवर असा विविध नृत्य कलाकारांच्या सोबतीने व वराचे सर्व मित्र, नातेवाईक यांच्या कौटुंबिक अशा नृत्याविष्काराने झाला. या संगीत रजनीचा संगीतमय सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पाच हजारांच्या पेक्षा अधिक असा जनसमुदाय सहभागी झाला होता. या संगीत सोहळ्यात वधुवराचे आई – वडील, भाऊ – बहीण, अन्य नातेवाईक, मित्र – मैत्रिणी यांनी देखील नृत्याविष्कार सादर केला. या संगीतरजनीच्या कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, लातूरचे माजी आमदार त्रिंबकनाना भिसे, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, विजय वाकेकर, माजी आमदार संजय दौंड, राजेश देशमुख यांच्यासह अन्य प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली. अत्यंत नेत्रदीपक, दिमाखदार संगीत रजनीचा सोहळा पार पडला.
दिनांक 5 जानेवारी रोजी विवाह व स्वागत समारंभाच्या दिवशी देखील सर्व कार्यक्रम अत्यंत पारंपरिक, आपल्या संस्कृतीला जपणारे असेच विधीवत झाले. ज्यामध्ये फेरे, अक्षदा व अन्य विधीचा समावेश होता. यासाठी देखील विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. विवाह सोहळ्यानंतर सांयकाळी अंबानगरीच्या सर्व नागरिकांसाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत सोहळ्यात पंधरा ते वीस हजार नागरिक सहभागी झाले होते. यावेळी लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अभिजीत देशमुख, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. राकेश जाधव, डॉ. राहुल धाकडे, डॉ. विश्वजित पवार, डॉ. अनिल मस्के, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. राजेश इंगोले यांच्यासह राजकिशोर मोदी व मोदी कुटुंबावर प्रेम करणारी मित्र कंपनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती. या पारंपारिक पद्धतीने साजरा झालेल्या विवाह सोहळ्यात कुठेही व कसल्याही पद्धतीचा बडेजाव केल्याचे दिसून आले नाही. स्वतः राजकिशोर मोदी हे आपल्या कुटुंबियांसह येणाऱ्या प्रत्येक पाहुणे, नागरिकांचे स्वागत करित होते.