लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं : अभिनेता रितेश देशमुखचे शिक्षण किती माहितीये का ?

टीम AM : केवळ विनोदीच भूमिका नव्हे, तर गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आजवर काम केलेले जवळपास सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘वेड’ हा सिनेमा तर मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे.

आज 17 डिसेंबर रोजी रितेशचा 45 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेशने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया डिसूझा हिनेही काम केले होते. मात्र, पहिल्या चित्रपटातून त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मस्ती’ चित्रपटातून रितेश देशमुख रातोरात प्रसिद्ध झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. अभिनेता असण्याबरोबरच रितेश देशमुख आर्किटेक्टही आहे.

रितेश देशमुखचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर रितेशचा भाऊही राजकारणात सक्रिय आहे. अभिनेता असण्यासोबतच रितेश आर्किटेक्ट देखील आहे. त्याने मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. इतकेच नाही तर, अभिनेता असण्याबरोबरच रितेश एका आर्किटेक्चरल आणि इंटीरियर डिझायनिंग फर्मचा मालक देखील आहे.

अभिनेता आणि आर्किटेक्ट असण्यासोबतच रितेश देशमुख एक प्रसिद्ध निर्माता देखील आहे. त्याने 2013 मध्ये ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. 2014 मध्ये दिवंगत निर्माते निशिकांत कामत निर्मित ‘लय भारी’ या चित्रपटाद्वारे रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये राधिका आपटेही मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर त्याचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.