बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर : केंद्राचं पथक जिल्ह्यात, 13 गावांची करणार पाहणी

टीम AM : बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून त्या अनुषंगानं, केंद्राचं दुष्काळ मूल्यांकन पथकं आज बीड जिल्ह्यातील 13 गावांना भेट देऊन पाहणी करत आहे. सकाळच्या सत्रात घोडका राजुरी तलावाची पाहणी या पथकानं केली आहे. 

कोरडे तलाव, खालावलेली पाणी पातळी, उत्पादनातील घट याबाबतची पाहणी हे पथक करेल. बीड तालुक्यातल्या घोडका राजुरीसह पोखरी, वडवणी तालूक्यातल्या ढोरवाडी, वडवणी, चौफळदरी तांडा, मोरवड, पसारा, धारुर तालूक्यातल्या भोपा आणि शिरुर तालूक्यातल्या मलकाचीवाडी, हिवरसिंगा, खोकरमोहा, रायमोहा, शिरूर या गावांमध्ये हे पथक पाहणी करेल. 

सहाय्यक संचालक मोतीराम, केंद्र सरकार निती आयोगाचे संशोधन अधिकारी एस. ई. मीना आणि केंद्र सरकारचे अप्पर सचिव मनोज कुमार या तीन प्रमुख अधिकऱ्यांचा या पथकात समावेश आहे.