धायगुडा पिंपळा गावात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सूरज भास्कर गोरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सूरज हा घरात एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, सूरज हा काल रात्री (दि. 6) राहत्या घरातील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी घरच्यांनी त्याच्या खोलीत पाहिले असता सूरजने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सूरजने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करित आहेत.