टीम AM : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील प्रांगणात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ‘महाविराट’ सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी मांजरा पट्ट्यातील सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे, याकरिता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असून प्रत्येक ठिकाणी भव्यदिव्य महाविराट सभा होत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील बैलगाडी मैदान, अंबासाखर कारखाना प्रांगणात तब्बल 100 एकरवर 11 डिसेंबर 2023 रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ‘महाविराट’ सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी मैदान करण्याचे काम दिवस – रात्र चालू असून मैदान तयार करण्यासाठी राजेसाहेब देशमुख, राजेभाऊ औताडे, प्रदीप ठोंबरे, विलास मोरे तसेच मराठा समाजातील अनेक व्यक्तीनीं त्यांच्याकडे असणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे.
पहाटेपासूनच राजेसाहेब देशमुख, रणजीत लोमटे, अमर देशमुख, तानाजी देशमुख, बाळासाहेब देशमुख, आबासाहेब पांडे, अजित गरड, प्रशांत जगताप, संतोष भगत, महेश जगताप, अमोल लोमटे, भीमसेन लोमटे, अभिजीत लोमटे, लहू शिंदे, श्रीमंत क्षीरसागर, गंगणे, ऋषीं लोमटे, स्वप्नील सोनवणे, प्रमोद भोसले यांच्यासह मांजरा पट्ट्यातील सर्व सरपंच, ग्रामस्थ ठाण मांडून तन – मन – धन लावून नियोजन करत आहेत. तर प्रत्येक गावात बैठकांच्या माध्यमातून ॲड. माधव जाधव, ॲड. संतोष लोमटे, प्रशांत आदनाक, धर्मराज सोळंके, राणा चव्हाण, प्रवीण ठोंबरे, संभाजी वाळवटे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करित आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात साधारणतः 100 एकरावर होणाऱ्या सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. या होणाऱ्या सभेकडे केज तसेच प्रामुख्याने परळी मतदार संघातील नागरिकांचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.