टीम AM : भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अंबाजोगाई न्यायालयातील अॅड. संदीप नवनाथ रुपनर (वय 24, रा. ममदापुर, ता. परळी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी (दि.3) दुपारी 2 वाजताच्या सुमारास मांडेखेल शिवारात झाला.
अॅड. संदीप रुपनर यांनी सामान्य परिस्थितीतून पुढे येत वकिलीचे शिक्षण घेतले. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कार्य पद्धतीमुळे वकिली क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. ते शुक्रवारी दुपारी परळी न्यायालयातील कामकाज आटोपून अंबाजोगाई न्यायालयात येण्यासाठी निघाले होते. मार्गात मांडेखेल शिवारात समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच अनेक वकील बांधवानी ‘स्वाराती’ रुग्णालयाकडे धाव घेतली. अॅड. संदीप रुपनर यांच्या मृत्यूमुळे एक उमदा तरुण सहकारी गमावला, अशी भावना वकील संघाकडून व्यक्त होत आहे.