टीम AM : मरीन ड्राईव्ह येथे समुद्रकिनाऱ्याच्या कठड्यावर बसण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. आता मरीन ड्राईव्ह हे कलाकारांसाठी उत्तम कट्टा ठरला आहे. अनेक कलावंत मरीन ड्राईव्हला आपली कला सादर करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क दोन तरुण सुंदर लावणी नृत्य सादर करताना दिसत आहे. यांची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण सुंदर लावणी करत आहे. चंद्रा या लोकप्रिय मराठी गाण्यावर ते लावणी करताना दिसत आहे. या दोघांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटील असो की अमृता खानविलकर या दोघींनाही मागे टाकेल अशी लावणी हे दोघे तरुण सादर करताना दिसत आहे. त्यांना बघण्यासाठी अनेक तरुण मंडळी आजुबाजूला जमलेले दिसत आहे. हे लावणी नृ्त्य पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल.
हा व्हिडीओ rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सादर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘आपली कला सादर करण्यासाठी मरीन ड्राईव्ह खूप छान ठिकाण आहे आणि प्रत्येक कलाकाराला तिथे खूप छान प्रतिसाद देतात. कलेचा आदर करतात. प्रत्येक रविवारी नक्की भेट द्या. वेगवेगळ्या कला बघा आणि प्रत्येकाचा आदर करा कलेला दाद द्या. धन्यवाद’. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.