धम्मचक्र प्रवर्तन दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी

टीम AM : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायासह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दसऱ्याच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, दीक्षाभूमीच्या स्तुपावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर इथं दीक्षाभूमी वर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास’ या विषयावर आधारीत मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.