टीम AM : पुढील दहा दिवस राज्याला ‘ऑक्टोबर हीट’ च्या झळा बसणार आहेत. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.
विदर्भात तापमान सरासरी 35 अंशावर जाणार असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात सरासरी तापमान 33 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस उन्हाच्या झळा जाणवणार आहेत.
राज्याच्या बहुतांश भागांतून मान्सूनने माघार घेतल्याने कोरडे हवामान आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा तीव्र स्वरुपाचा जाणवणार आहे. पावसाची शक्यता नाही. ही उष्णतेची लाट राज्यभर जाणवणार आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 37.1 अंश सेल्सिअस तर अकोल्यात 37.2 अंश सेल्सिअस नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पारा 34 अंशांच्या वर गेला आहे. पाऊस नसल्यामुळे नागरिकांना पुढील आठवड्यात उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.