टीम AM : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. आज भारताच्या महिला कबड्डी टीमने गोल्ड मेडल जिंकले. यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या 100 आणि गोल्ड मेडल्सची संख्या 25 झाली आहे.
भारताच्या महिला कबड्डी टीमने अंतिम सामन्यात तैवानला 26 – 25 अशा फरकाने हरवलं. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम 14 – 9 ने आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे, टीमचे अभिनंदन केले आहे.