कुंकुलोळ – भराडिया परिवाराचा उपक्रम
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कुंकूलोळ व भराडिया परिवाराने २५ कॉटची मदत देऊन रुग्णालयात निर्माण झालेली रुग्णांची गैरसोय दूर केली आहे. येथील युवा माहेश्वरी परिवाराच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन रुग्ण्यालयात करण्यात आले होते.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अनेक वॉर्डांमध्ये रुग्णांना कॉट कमी पडू लागल्याने त्यांना जमीनीवर गादी टाकून रुग्णसेवा द्यावी लागत होती. ही बाब अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा पुणे येथील उद्योगपती रतिलाल कुंकूलोळ व सामाजिक कार्यकर्ते गिरीधारीलाल भराडिया यांच्या निदर्शनास आली. या दोघांनी युवा माहेश्वरी परिवाराच्या मदतीने स्वा. रा. ती. रुग्णालायत २५ कॉटचा लोकार्पण सोहळा रुग्णालयात घेतला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नानासाहेब गाठाळ, रतिलाल कुंकूलोळ, गिरीधारीलाल भराडिया, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. अमित लोमटे, शांतिलाल सेठिया, ललित बजाज, संजय लोहिया, धनराज सोळंकी, युवा माहेश्वरीचे अध्यक्ष पवन भराडिया, राधेश्याम लोहिया, दत्ता लोहिया, बालाजी मंत्री, रोहन मुंदडा, भारत लाड, रमेश भुतडा, सुनिल भराडिया, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. लोकसहभागात रुग्णसेवेसाठी होणारी मदत ही दिशादर्शक असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.