वादग्रस्त रिलेशनशिप्स, संघर्षमय आयुष्य : जाणून घ्या मनिषा कोईराला हिचा जीवनप्रवास

टीम AM : आज मनिषा कोईराला हिचा 54 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशकात मनीषा कोईराला ही अभिनेत्री चांगलीच लोकप्रिय होती. तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं तिनं अनेकांची मनं जिंकली आहेत. तिच्या आगळ्यावेगळ्या अभिनयाचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. मनीषा काहीकाळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. एका जीवघेण्या आजाराचा सामना करत ती फार या मोठ्या आजारातून बाहेर पडली होती. यानंतरही तिनं आपलं करिअर सुरू ठेवले आहे.

1994 साली आलेला ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानं तेव्हा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. आज तिच्या वाढदिवसाला आपण जाणून घेऊया तिच्या लव्ह अफेअर्स, करिअर, संघर्षाबद्दल. मनीषा कोईरालाचे आयुष्य सोप्पं नाही, तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांतून कामं तर केली आहेतच परंतु त्याचसोबत तिनं आपल्या संघर्षानं तिनं अनेकांना प्रेरणा दिली आहे. 

नाना पाटेकर आणि मनिषा कोईरालाचं अफेअर ? 

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची भेट 1996 साली आलेल्या ‘अग्नी साक्षी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यादरम्यानच त्यांच्या अफेअरला सुरूवात झाली होती. त्यावेळी ती अभिनेता विवेक मुश्रनला डेट करत होती, परंतू, तिचे नाते संपले होते. त्यातून त्यावेळी नाना यांचे आयशा झुल्का या अभिनेत्रीसोबतही अफेअर सुरू आहे, अशी चर्चा होती. त्यांचे नाते पुढे फार काळ टिकले नाही. 

पंतप्रधानांची नात

मनीषा कोईराला ही बिश्वेर प्रसाद कोईराला यांची नातं आहे. ते नेपाळचे पंतप्रधान होते. त्यामुळे मनीषाची एक वेगळी ओळख होती. परंतू, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मात्र तिनं आपली एक वेगळी ओळख तयार केली आणि आज बड्या अभिनेत्रींनाही ती टक्कर देते. 

जीवघेण्या आजारातून बरी

मनीषाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून बराच काळ लांब होती. ती उपचारांसाठी अमेरिकेला केली होती. परंतू, या आजारातून ती पुर्णपणे बरी झाली आणि तिनं बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक केले. 2018 साली आलेल्या ‘संजू’ या चित्रपटातून तिनं नर्गिस यांची भुमिका केली होती. त्यानंतर तिनं ओटीटीवरही पदार्पण केले आहे. तिचा ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट गाजला होता.

ऐश्वर्याशी पंगा ? 

अभिनेत्री ऐश्वर्या आणि तिच्यामध्येही एका व्यक्तीमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. मॉडेल राजीव मुलचंदानीमुळे हा वाद उद्भवला होता. मनीषासाठी ऐश्वर्याला राजीव सोडून गेला होता, अशी चर्चा होती.