महाविकास आघाडीत एकी, गुप्तभेटीबाबत काय म्हणाले पवार, वाचा.. 

टीम AM : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाली होती. पुण्यातील एका उद्योजकाच्या बंगल्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत एकी आहे, कोणताही संभ्रम नाही. गुप्तभेटीबाबत संभ्रम निर्माण करून नका, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत एकी आहे, गुप्तभेटीबाबत वारंवार प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करू नका. माझ्या आणि अजित पवार यांच्या भेटीवर मी कालच भूमिका मांडली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाणार नाही. इंडियाची येत्या एक सप्टेंबरला मुंबईत तिसरी बैठक होणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, यावर देखील पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक जेलबाहेर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.