टीम AM : लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात झालेल्या नोकरभरतीमध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे उकळले जात असल्याच्या चर्चा होत्या. या संदर्भात विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
तसेच, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लातूरचे आरोग्य परिमंडळ अधिकाऱ्यांची समिती देखील नेमण्यात आली होती. मात्र, आता थेट भरतीच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या भरती प्रक्रियेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी गुंतले असल्याची चर्चा होती. आता ज्यांनी ज्यांनी पैसे देऊन नोकरी मिळवली आहे, त्यांनी पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारायला सुरुवात केली आहे.