टीम AM : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळल्याची माहिती, आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सर्वाधिक रुग्णसख्या बुलडाण्यात असून, तिथं 30 हजार 592 रुग्णांना हा त्रास होत आहे.
त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत. साथग्रस्त भागात घरोघरी सर्वेक्षण सुरू असून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. उपचारासाठी औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
अशी घ्या खबरदारी
डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. डोळ्यांना स्पर्श करुन इतर व्यक्तींशी हस्तांदोलन करणे, वस्तूंना स्पर्श करणे, इतर व्यक्तींचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे, हात साबणाने वारंवार धुवावे. गॉगल अथवा चष्मा वापरावा. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. नियमितपणे मास्कचा वापर करावा. तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, चिलटांमुळे हा संसर्ग पसरु शकतो, त्यामुळे खबरदारी घ्यावी. जवळच्या शासकीय दवाखान्यातून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा. आपल्या गावात या आजारांचे रुग्ण आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यास कळवावे.