अभिनंदनीय : अविनाश साबळेंची ‘पॅरिस ऑलिम्पिक – 2024’ साठी निवड

टीम AM : रविवारी पोलंडमध्ये झालेल्या तिसऱ्या डायमंड लीगमध्ये सहाव्या स्थानावर बाजी मारत बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे याने ‘पॅरिस ऑलिम्पिक – 2024’ मध्ये आपले स्थान घट्ट केले. अविनाश साबळे याची ऑलिम्पिकसाठी निवड होण्याची दुसरी वेळ आहे. अविनाश हा सध्या इंडियन आर्मीच्या वतीने 3000 मिटर स्टिपलचेस या खेळात सहभागी झाला आहे.

पोलंड मधील डायमंड लीगमध्ये या स्पर्धेसाठी स्टिपलचेस साठीची वेळमर्यादा 8 मिनटे 15 सेकंद इतकी होती. पण अविनाशने हे अंतर अवघ्या 8 मिनिटे 11.63 सेकंदात पूर्ण केले. त्यामुळे त्याचे ऑलिम्पिक – 2024 मधील स्थान घट्ट झाले.

मागील 2022 मध्ये झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा आठवा क्रमांक आला होता. यापूर्वी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.

अतिशय कठीण परिस्थितीत अविनाश याने आपले शिक्षण पूर्ण करत इंडियन आर्मीत भरती झाला. त्यानंतर त्याला स्टिपलचेसमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने यापूर्वी धावण्याच्या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.