टीम AM : निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतं, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज अमरावती इथं पत्रकारांशी बोलत होते.
अमरावती आणि अकोला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज अमरावती इथं झाला, या मेळाव्याला मार्गदर्शन करताना, सत्ता संघर्षासाठी आणि राजकारणासाठी वापरला जाणारा पैसा हा मेळघाटातील कुपोषण संपवण्यासाठी वापरला तर ते समृद्ध होईल, असं मत ठाकरे यांनी व्यक्त केलं.
आपल्यावर घरी बसून राहल्याची टीका सगळेजण करतात, मात्र आपण घरी बसलो होतो, कोणाची घरं फोडली नाही, असं ठाकरे म्हणाले.