अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

टीम AM : केज तालुक्यातील सारणी (सां) येथील ओमकार बालासाहेब केदार (वय 18) या युवकाचा बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे.

ओमकार हा गावातील मामाच्या मालवाहतूक गाडीवर एक ट्रीपसाठी सोबत गेला होता. गाडी नामलगाव फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर मुक्कामासाठी थांबली असता दि. 19 रोजी रात्री साडेबारा वाजता अज्ञात वाहन ओमकार याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर गावातील शेतात दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सारणी, सांगवी गावातील ग्रामस्थ तसेच परिसरातील नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आजी,आई – वडील, एक बहीण असा त्याचा परिवार आहे. एकुलता एक मुलगा असल्यामुळे सारणी, सांगवी गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.