पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला : 4 ठार तर 7 गंभीर जखमी

टीम AM : पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा परतत असताना बुुुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराच्या पिलरला भाविकांना घेऊन जाणारी क्रुझर गाडी जोरदार धडकली.

या भीषण अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनातील जखमींना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मृत भाविकांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्यानं, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या भाविकांना पुढील उपाचारार्थ अकोला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.