शरद पवार यांची टीका
टीम AM : सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिक्षित निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुधा माहिती असावा, त्यामुळेच ते मी पुन्हा येईन म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारच्या प्रकल्पांचं स्वागत व्हायला हवं, मात्र, ते प्रकल्प स्थानिकांना विचारात घेऊन उभे राहावेत, बारसू रिफायनरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.
सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला पवार यांनी दिला दिला आहे. देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजपा पक्षांचं सरकार असून, भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजप समोर सक्षम पर्याय दिला जाईल, असं पवार म्हणाले.