टीम AM : वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’ च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे. सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’ !
साई – पियुष यांच्या उत्कंठावर्धक पार्श्वसंगीतावरून या चित्रपटाचे वास्तव लक्षात येते. ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक आणि भूमिका, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे या कलाकारांचा दर्जेदार अभिनय, स्नेहल तरडें मधील संवेदनशील स्त्री, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाची पकड, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड हिचा कौतुकास्पद अभिनय, याशिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची भूमिका आहे.
यावेळी चित्रपटातील कलाकारांसोबतच गायिका वैशाली माडे, अभिनेते – दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’ मध्ये वेलकम करणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं. हिंदुस्थानी भाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपटाचे निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला. किरण गायकवाडने डिजे होत सर्व मान्यवरांना संगीताच्या तालावर नाचवलं ! या चित्रपटाची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांची असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे आहे.