राज्यात आठशेहून अधिक अनधिकृत शाळा : 177 शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश

टीम AM : राज्यातल्या सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी आपापल्या विभागातल्या सर्व शाळांची कागदपत्रं तपासून त्यांच्या वैधतेविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्यातल्या शिक्षण आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत. 

राज्यात बनावट ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे किमान आठशेहून अधिक अनधिकृत शाळा सुरु असून, त्यापैकी 177 शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर आणखी किमान 77 शाळा अनधिकृत असल्याचं शिक्षण विभागाकडून जाहीर होऊ शकतं. 

येत्या आठवडाभरात हा अहवाल आल्यानंतर राज्यातल्या अनधिकृत शाळांची नेमकी आकडेवारी समोर येणार असून, पुढील कारवाईची दिशा देखील निश्चित होणार आहे. सर्व प्रकारची माहिती घेऊनच पालकांनी या शाळांमधून आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घ्यावा असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे.